Coronavirus IndiGo does a U-turn will not cut salaries 
देश

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! कंपनीने घेतला हा मोठा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय कंपनीने मागे घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी काल (ता. २३) कर्मचाऱ्यांना दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तसंच ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यादरम्यान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. यानंतर इंडिगोनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता तो मागे घेण्यात आला आहे. 

Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन

सरकारनं यापूर्वी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कपात न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. याच धर्तीवर कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीच्या कार्यकारी समितीतील सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छेनुसार या महिन्यात वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य कर्मचाऱ्यांना त्यांचं एप्रिल महिन्याचं पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे. सरकारच्या सुचनेचा आदर करत कंपनीनं वेतन कपात रद्द केल्याचं दत्ता यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT