Coronavirus in Delhi esakal
देश

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद

गेल्याकाही दिवसांपासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आज तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २२ रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली. काल शुक्रवारी ३,५४५ रुग्णांची भारतात नोंद झाली होती. (Coronavirus infection is on rise in the country over three thousand new patients found)

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या चोवीस तासात ३,८०५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळं देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४,३०,९८,७४३ वर पोहोचली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०,३०३ असून जी एकूण रुग्णांच्या तुलनेत ०.०५ टक्के आहे. गेल्या चोवीस तासातील २२ रुग्णांच्या मृ्त्यूंची भर पडल्यानं देशातील कोरोना रुग्णांच्या एकूण मृत्यूची संख्या ५,२४,०२४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, देशातील कोरोना रिकव्हरीचा रेट ९८.७४ टक्के असून गेल्या चोवीस तासात ३,१६८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं देशातील रुग्ण बरे झाल्याची एकूण संख्या ४,२५,५४,४१६ इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ४,८७,५४४ रुग्णांच्या तपासण्या पार पडल्या. यामुळं देशातील दररोजचा पॉझिटिव्हीटी दर ०.७८ टक्के तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ०.७९ टक्के आहे.

आत्तापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेत १९० कोटी कोरोनाचे लसीकरणाचे डोस पार पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT