coronavirus these three states country became corona free in india 
देश

गुड न्यूज : देशातील 'ही' तीन राज्ये कोरोनामुक्त...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असताना देशासाठी एका चांगली बातमी पुढे येत आहे. देशातील तीन राज्य कोरोनामुक्त झाली असून, यामुळे देशापुढील चिंता काही प्रमाणात तरी कमी झाली आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर अशी कोरोनामुक्त झालेल्या राज्यांची नावे आहेत.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा आधीच कोरोनामुक्त झाले होते. आता अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. या तिन्ही राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र, आता या राज्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यानंतर येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दमण दिव, दादरा आणि नगर हवेली, लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आतापर्यंत प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 8 लाख 52 हजार 703 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 47 हजार 750 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर इटली, स्पेनलाही मोठा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT