Corona-Patient 
देश

कोरोना कहर! देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1.50 लाखांच्या जवळ

पीटीआय

नवी दिल्ली - जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1.45 लाखांच्याही पुढे गेली आहे. तसेच देशात दररोज 6 हजारांपेक्षाही अधिक कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने चिंता वाढली आहे.

सोमवारी देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,45,380 पर्यंत पोहोचला आहे, तर गेल्या चोवीस तासात 6,335 नव्या रुग्णांची यात भर पडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4167 झाली असून सोमवारी 146 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी यातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 60,491 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच रिकव्हरी रेट 41.60 पर्यंत पोहोचला आहे. 

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्याही लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांचे राज्य ठरले आहे. सोमवारी राज्यात (Covid-19) कोविड-१९ ने 2,436 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 52,667 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 60 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून मृत्यूचा आकडा 1695 झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा वाढता आलेख पाहता महाराष्ट्रातील स्थिती गंभीर होत असल्याचं दिसत आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण केली आहे. जगभरात आतापर्यंत 55 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर मृतांचा आकडा 3,47,152 झाला आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये तर कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत 18 लाख कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळे अमेरिका कोरोना महामारीने पूर्णपणे हतबल झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) मलेरियावर प्रभावशाली असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोरोनावरील उपचारासाठी होणारा वापर बंद केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनोतून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा क्लिनिकल ट्रायल थांववण्याचा निर्णय आरोग्य संघटनेने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT