Corona, India 
देश

कोरोनाचा कहर थांबता थांबेना! मागील 24 तासांत देशात सर्वाधिक बळींची नोंद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: कोरोना विषाणू महामारी दिवसेंदिवस भयंकर रुप धारण करत आहे. शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2.36 लाखांच्याही पुढे गेला आहे. या सोबतच भारत जगभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत सहाव्या स्थानावर गेला आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या इटलीमधील रुग्णांपेक्षाही अधिक झाली आहे. यापूर्वी भारताने चीन या देशाला मागे टाकले होते. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 6,642 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील स्थिती गंभीर बनत चालली आहे.

भारतात टाळेबंदी 5 चे पर्व सुरु असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अनेक मजूर, कामगार आपापल्या गावी परतले आहेत. तसेच देशाअंतर्गत ये-जा वाढत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 9887 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच शुक्रवारी 295 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. 

1 मे रोजी देशात कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार होती. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्या 1150 होती. आज कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 36 हजार 657 इतकी नोंदली गेली आहे. तर कोरोना विषाणूमुळे 6,642 लोकांचा बळी गेला आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार स्पष्ट होत आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याचं दिसत आहे. तसेच कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. मे महिन्याच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांची संख्या सहा पटींनी वाढली आहे, तर मृतांची संख्या पाच पटीने पाढली आहे. 

समाधानाची बाब म्हणजे देशात covid-19 मधून बरे होणाऱ्याची संख्या 1 लाख 14 हजारांच्या पुढे गेली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचा दर( रिकव्हरी रेट) 50 टक्क्यांच्या जवळ गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी बरे होणाऱ्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. देशाने रुग्णांना घरी सोडण्याच्या निकषामध्ये बदल केल्याने ही आकडेवारी वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र देशातील सर्वाधिक बाधित राज्य ठरलं आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 80,229 झाली आहे. शुक्रवारी 2436 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 139 जणांचा बळी गेला असून आतापर्यंत 2849 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. शुक्रवारी 1475 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या राज्यात 42,215 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 35,156 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात 5 लाख 22 हजार 946 लोकांची covid-19 चाचणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT