coronavirus update Government's covid beep app to fight against covid-19 
देश

कोरोनाला हरवण्यासाठी सरकारचं आणखी एक पाऊल; लाँच केले एक जबरदस्त अॅप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीविरोधात यशस्वी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने 'कोविड बिप' हा अॅप लाँच केला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी जागरुगकता हेच प्रभावी अस्त्र आहे. त्यामुळे या विषाणूला घाबरुन जाऊ नका, असं सिंह म्हणाले आहेत. 'कोविड बिप' अॅप कोरोनाबाधित रुग्णांच्या शाररीक घटकांचे मोजमाप करणारी प्रणाली आहे. हे स्वदेशी वायरलेस अॅप आहे. कोविड बिप हे अॅप कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(IIT) हैद्राबाद आणि डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ESIC), हैद्राबाद यांनी या अॅपची निर्मिती केली आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या टाळेबंदीनंतर देश हळहळू यातून बाहेर पडत आहे. देशात अनलॉक-1 चे सत्र सुरु झाले आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांनी जागरुकता दाखवायला हवी. त्यादृष्टीने कोविड बिप अॅप पुरक ठरेल, असं सिंह म्हणाले आहेत.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
सोनू सूदने मातोश्रीवर; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा
-----------
'कन्टिन्यूअस ऑक्लीजेनैशन अॅन्ड वायटल इन्फॉर्मेशन डिटेक्शन बायोमेड ईसीआईअल ईएशआईसी पोड', असं कोविड बिप अॅपचं दिर्घ नाव आहे. हे अॅप स्वदेशी, किफायतशीर आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शरीरातील घटकांचा अभ्यास करणारे वायरलेस अॅप आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. भारतातील नामांकित संस्था अगदी कमी खर्चात देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर कसा तोडगा काढू शकतात याचं कोविड बिप अॅप हे उत्तम उदाहरण आहे. तसेच देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे, असं जितेंद्र सिंह म्हणाले आहेत.

काय आहे कोविड अॅप?
कोविड अॅप हे शरीरातील बदलांवर लक्ष ठेवणारी एक प्रणाली आहे. हे एक वायरलेस मोबाईल अॅप आहे. यात आक्रमक नसलेला रक्तदाब(NIBP), इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) आणि श्वसन दर याचे मोजमाप ठेवले जाते. त्यामुळे हे अॅप covid-19 पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांसारख्या साधणांची(पीपीई कीट) बचत करेल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT