China Covid Outbreak esakal
देश

China Covid Outbreak : चीनमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताला कोरोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलीय.

मागच्या आठवड्यात चीनमध्ये एका दिवसामध्ये साडेतीन कोटी कोरोना रुग्ण आढळ्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागलेला व्हीडिओ व्हायरल झाला होता. परवा चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी 'मिशन मोडवर कोरोनाशी लढावं लागेल' असं म्हणून जीव वाचवण्यासंदर्भात भाष्य केलं होतं.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

चीनसह अमेरिका, जपान दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज मोठा निर्णय घेऊन सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

''१ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. त्यांना प्रवासापूर्वी आपला रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल'' असं ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

यापूर्वी बुधवारी अमेरिकेने चीनमधून आलेल्या प्रवाशांना कोरोना चाचण्या बंधनकारक केल्या आहेत. पुढचे ४० दिवस कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचे मानले जात आहेत. पुढच्या महिन्यात भारतात कोरोनाचं संक्रमण वाढेल, असं सांगितलं जात आहे. मात्र ही लाट जास्त तीव्र नसेल, असंही आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT