kognoli check post Esakal
देश

RT-PCR निगेटिव्ह अहवाल सक्ती रद्द; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

कर्नाटक प्रवेशावेळी कोरोना लशीकरणाचे दोन डोसचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : महाराष्ट्रातून (Maharashtra)कर्नाटकात येणाऱ्यांसाठी असलेली आरटीपीसीआर (RTPCR) तपासणीच्या निगेटिव्ह अहवालाची सक्ती मागे घेण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.११) रात्री उशिरा राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी. ए. अनिलकुमार (T.A. Anilkumar)यांनी ही घोषणा केली आहे. पण, कोरोना लशीच्या दोन मात्रा किंवा पूर्ण लसीकरण झाल्याची कागदपत्रे मात्र कर्नाटक प्रवेशावेळी तपासणी नाक्यावर दाखवावी लागणार आहेत.

कर्नाटक प्रवेशावेळी कोरोना लशीकरणाचे दोन डोसचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

विमान, रेल्वे की रस्ता या मार्गाने येणाऱ्या किंवा खासगी वाहनातून येणाऱ्या सर्वांनाच आरटीपीसीआर सक्तीतून सूट देण्यात आली आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ही सक्ती रद्द करण्यात आल्याचेही अनिलकुमार यांनी नमूद केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कर्नाटक सरकारने कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटीपीसीआर सक्ती करण्यात आली हाती. म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र तपासणी नाक्यावर दाखवावे लागत होते. यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर काटेकोर तपासणी सुरू केली होती.

प्रमाणपत्र नसेल तर माघारी पाठवून दिले जात होते. यावर तोडगा म्हणून बोगस आरटीपीसीआर प्रमाणपत्र देण्याचा प्रकार सुरू होता. त्याचा पर्दाफाश गेल्याच आठवड्यात निपाणी पोलिसांनी केला होता. पण आता ही सक्तीचं मागे घेण्यात आल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सीमेवरील कोगनोळी तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर सक्ती काटेकोर पणे केली जात होती. त्याचा परिणाम आंतरराज्य प्रवासी वाहतुकीवर झाला होता. पण आता ही वाहतूक पुन्हा सुरू होईल. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर सप्टेंबर महिन्यात आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्यात आली होती पण दोन महिन्यात पुन्हा लागू करण्यात आली होती. सक्ती मागे घेतल्याने आता सीमेवरील तपासणी नाकेही तात्पुरते बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT