cottan 
देश

विदर्भातील कापसाच्या क्षेत्रात वाढ; या उलट राज्यात सहा टक्के घट

चेतन देशमुख

यवतमाळ : बदललेले पर्जन्यमान, खर्चाच्या तुलनेत कापसाला असलेला हमीभाव यातच उद्भवलेले कोरोनाचे संकट आदी कारणांमुळे देश तसेच राज्यात कापसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. दुसरीकडे विदर्भात गेल्यावर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या कापसाचे दर वाढलेले आहे. हवामान तसेच रोग न आल्यास यंदा कापूस शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देण्याची शक्यता आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांचे कापूस हुकमी पीक म्हणून ओळखले जाते. याला वेगवेगळी कारणे आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात कापूस शेतकऱ्यांना मोठा आधार देतो. खर्च जास्त असतानाही शेतकरी या पिकांना प्राधान्य देतात. याशिवाय, सिंचनाचा प्रश्‍नही आहे. विदर्भाच्या तुलनेत पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र सिंचनाच्या बाबतीत ‘सुजलाम सुफलाम’आहे. याठिकाणी पांरपरिक पीकांऐवजी इतर पिकांनाही प्राधान्य दिले जाते.

विदर्भात कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. सिंचन कमी आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांकडून कापसाला प्राधान्य दिले जात असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी, विदर्भात कापसाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. गेल्यावर्षी देशात १३३ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा यात घट झाली असून ११५ ते १२० लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे. राज्यातही तशीच स्थिती आहे. गेल्यावर्षी ४२.८८ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३९.३५ लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे.

विदर्भात याउलट स्थिती आहे. अमरावती विभागात गेल्यावर्षी दहा लाख १४ हजार हेक्टरवर लागवड होती. ती यंदा दहा लाख ५० हेक्टर झाली आहे. नागपूर विभागात सहा लाख २० हजार हेक्टरवर असलेली लागवड यंदा सहा लाख २४ हजार हेक्टर झाली आहे. यंदा कापसाला चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना हवामान तसेच कपासावर येणारी रोगराई न आल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना कापूस फायद्यांचा ठरू शकतो.

लागवडीतील घट-वाढ

  • देश - घट १३ लाख हेक्टर

  • राज्य - घट ३.५३ लाख हेक्टर

विदर्भ विभागनिहाय

  • नागपूर - वाढ ४ हजार हेक्टर

  • अमरावती - वाढ ३६ हजार हेक्टर

  • विदर्भ एकूण - वाढ ४० हजार हेक्टर

यंदा देशात तसेच राज्यात कापसाचे क्षेत्र घटले आहे. विदर्भात स्थिती उलट आहे. सध्या इतर राज्यात चांगला भाव मिळत आहे. राज्यातही यंदा कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्जन्यमान, रोगराईचे संकट न आल्यास शेतकऱ्यांना यंदा फायदा होईल.
- गोविंद वैराळे, कापूस अभ्यासक, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT