Lockup facility few police stations crime rate rise kolhapur  sakal
देश

कबर खोदून पोस्टमार्टम करा! संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्यायालयाचे आदेश

पोलीस कोठडीत असताना तरुणाचा तीन महिन्यांपुर्वी झाला होता मृत्यू.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कासगंजमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादाय घटना घडली. एका युवकाचा तीन महिन्यांपुर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. कोर्टाने आता या प्रकरणात महत्वाचे आदेश दिले आहेत. संशयास्पद मृत्यू झालेल्या या तरुणाची कबर खोदून त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. अल्ताफने दुसऱ्या धर्मच्या मुलीला पळवून नेल्याचा आरोप होता.

अल्ताफचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या बाथरूममध्ये मिळाला होता. एका पाईपला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या मारहाणीत या तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणाच्या पित्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने कबर खोदून मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती अंजनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती दीपक वर्मा यांनी यूपी सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता मनीष गोयल यांना विचारलं की, राज्याबाहेरील AIMS मध्ये शवविच्छेदन करण्यास सरकारला काही आक्षेप आहे का? यावर सरकारने आक्षेप नसल्याचं सांगितलं. यानंतर न्यायालयानं राज्य सरकारला अल्ताफचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याचे आणि एम्स नवी दिल्ली येथे पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT