नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, नव्याने सापडलेल्या डेल्टा प्लस (delta plus variant) या व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्यप्रदेशात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. अशातच दिलासादायक बातमी म्हणजे भारतात तयार झालेली कोव्हॅक्सीन (covaxin) ही लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने (NIH America) दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. (covaxin effective on alpha and delta varient of corona says nih of america)
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने या लशीचा अभ्यास केला. त्यामध्ये कोव्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यानुसार अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटविरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे या आढळून आले. त्यामुळे ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाले, असे या संस्थेने म्हटले आहे.
लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेली फेज २ ट्रायलची माहितीचा आधार घेत त्यांनी ही लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच अद्याप प्रकाशित न झालेल्या अहवालाचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. २५८०० लोकांवर ट्रायल घेण्यात आले. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींवर ही लस ७८ टक्के प्रभावी आहे, गंभीर कोरोनाविरोधात १०० टक्के, तर लक्षणे नसणाऱ्या कोरोनाविरोधात ७० टक्के प्रभावी असल्याचे म्हटले आहे.
लशींचा प्रभाव वाढविण्यासाठी कोव्हॅक्सीनचा अलहाड्रॉक्सीक्वीम-२ या पदार्थाचे बुस्टर देण्यात आले आहे. ते अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या निधीमधून देण्यात आले आहे, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सीनचा तिसऱ्या फेजची माहिती नसल्यामुळे परवानगी नाकारली होती. त्यामुळे कोव्हॅक्सीन घेतलेल्यांना विदेशात प्रवास करणाऱ्यावर बंदी आली होती. आता देखील ही बंदी कायम आहे. मात्र, अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठीत या संस्थेने कोव्हॅक्सीन प्रभावी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.