bharat biotech
bharat biotech 
देश

Covaxin 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित: भारत बायोटेक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत बायोटेकने (Bharat Biotech) आज एक महत्त्वाचा दावा केला आहे. भारत बायोटेकने आज सांगितलंय की त्यांची Covaxin ही कोरोना लस 2-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी "सुरक्षित, सुयोग्य आणि इम्युनोजेनिक" असल्याचे आढळून आलं आहे.

भारत बायोटेकनं 2-18 वयोगटातील निरोगी मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांवर कोवॅक्सिन लशीची सुरक्षितता, प्रतिक्रियाकारकता आणि इम्युनोजेनिसिटीचे मूल्यांकन करण्यासाठी एक अभ्यास केला होता. त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकामध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा इला म्हणाले की, "लहानग्यांच्या लोकसंख्येतील कोवॅक्सिनच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा खूप उत्साहवर्धक आहे. लसीची सुरक्षितता मुलांसाठी अत्यंत आवश्यक मुद्दा आहे. आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की, कोवॅक्सिनने आता मुलांमध्ये सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी डेटा सिद्ध केला आहे. प्रौढ आणि मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी COVID-19 लस विकसित करण्याचे आमचे ध्येय आम्ही साध्य केले आहे, असंही त्यांनी जाहीर केलंय.

जून-सप्टेंबर 2021 दरम्यान बालरोग लोकसंख्येमध्ये आयोजित केलेल्या क्लिनीकल ​​​​चाचण्यांनी मजबूत सुरक्षितता, प्रतिक्रियाकारकता आणि इम्युनोजेनिकता दर्शविली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (Central Drugs Standard Control Organisation - CDSCO) कडे त्यांच्याकडून डेटा सबमिट करण्यात आला होता आणि अलीकडे DCGI कडून 12-18 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे.

या अभ्यासात असं आढळून आलंय की, या चाचणीदरम्यान कोणतीही गंभीर अशी नकारात्मक घटना नोंदवली गेली नाही. एकूण 374 नमुन्यांमध्ये सौम्य किंवा मध्यम तीव्रतेची लक्षणे आढळून आली. त्यातील 78.6 टक्के एका दिवसात निराकरण झाले.

चाचणीसाठी, आरटी-पीसीआर आणि एलिसा चाचणी (एंझाइम-लिंक्ड इम्युनोएसे) द्वारे SARS-CoV-2 साठी 976 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 525 पात्र सहभागींची नोंदणी झाली. वयाच्या आधारावर, सहभागींना वय कमी असण्याच्या पद्धतीने तीन गटांमध्ये वेगळे केले गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT