supreme court supreme court
देश

Corona Update : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण; सुनावणी...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने वेगाने पसरण्यास सुरुवात केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना कोविड-19 ची लागण झाली आहे, तर पाचवे न्यायाधीश नुकतेच बरे झाले आहेत.

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात सामील असलेल्या न्यायाधीशांचा कोरोनाची लागण झालेल्या न्यायाधीशांमध्ये समावेश आहे.

खंडपीठातील आणखी एका न्यायाधीशाची तब्येत ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सोमवारी होणारी या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. महामारीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, कोर्टाच्या कामकाजावर वाईट परिणाम केला होता, त्यावेळी अनेक न्यायाधीश आणि शेकडो न्यायालयीन कर्मचारी संक्रमित झाले होते.

रविवारी (23 एप्रिल 2023) देशात कोरोनाचे 10,112 नवे रुग्ण आढळले आहेत. कोविड-19 मुळे 19 जणांचा मृत्यू झाला. तर आदल्या दिवशी 12000 हून अधिक कोरोना संसर्गाच्या रुग्णांची नोंद झाली होती. या अर्थाने आज कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस 67,806 आहेत,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT