indian money 
देश

लस घ्यायला जाताय? जाणून घ्या प्रति डोस किंमत

नामदेव कुंभार

तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी रजिस्ट्रेशनला दोन दिवसात सुरुवात होणार आहे

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून लसीकरण मोहिम आता एक मे पासून व्यापक करण्यात येत आहे. एक मे पासून देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. याआधी दोन टप्प्यात लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. 16 जानेवारी 2021 रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्याना लशीचे डोस देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात (एक मार्च आणि एक एप्रिल) 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी रजिस्ट्रेशनला दोन दिवसात सुरुवात होणार आहे. CoWin अॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.

भारतामध्ये सध्या तीन लसी दिल्या जात आहे. यामध्ये सीरम इन्सिट्युटची 'कोविशील्ड' तर भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन'चा समावेश आहे. याशिवाय रशीयाची 'स्पूतनिक' ही लसही उपलब्ध आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस राज्य सरकाच्या रुग्णालयात 400 रुपये प्रति डोस किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची किंमत 600 रुपये असणार आहे. कोविशील्डची खासगी रुग्णालयातील किंमत 600 रुपये असेल तर कोव्हॅक्सिन 1200 रुपयांना मिळणार आहे.

भारतात आतापर्यंत (99 दिवसांमध्ये) 14 कोटीहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत. सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या कोविड 19 लसीकरण केंद्रावर लस मोफत देण्यात येईल. तर खासगी रुग्णालयात पारदर्शकपणे लशीसाठी सेल्फ सेट कॉस्टची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत लस घेण्यासाठी CoWIN अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.

रजिस्ट्रेशन कसं करायचं?

  • CoWIN चे अधिकृत संकेतस्थळ cowin.gov.in वर तुम्हाला मोबाइल क्रमांक किंवा आधार नंबर द्यावा लागेल.

  • तुमच्या मोबाइलवर त्यानंतर एक ओटीपी येईल तो सबमिट करावा लागेल.

  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेल्या लोकांची नावे दिसतील.

  • तुम्हाला लस कधी घ्यायची, कोणत्या वेळेत घ्यायची हे निश्चित करता येतं.

  • त्यासाठी नावाची यादी येते त्यासमोर कॅलेंडर दिसतं. तिथं तारीख निवडता येते.

  • त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, शहर, वॉर्ड, पिन नंबर याची माहिती द्या.

कोणती कागदपत्रे लागतात?

  • लसीकरणासाठी नोंदणी करत असताना तुमच्याकडे ओळखपत्र हंव.

  • ओळखपत्रावर तुमचा फोटो असायला हवा.

  • कोविन अॅपवर नोंदणी करताना केवायसी ओळखपत्र स्कॅन करून जोडावं लागतं.

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • मतदान ओळखपत्र

  • ड्रायव्हिंग लायसन

  • कामगार मंत्रालयाने दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

  • MGNREGA जॉब कार्ड

  • पासपोर्ट

  • बँक / पोस्ट ऑफिसचे पासबुक

  • पेन्शनची कागदपत्रे

लसीकरणानंतर काय?

  • लस घेतल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी मिळेल.

  • रेफरन्स आयडीवरून लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT