special trains 
देश

हा घ्या पुरावा : रेल्वेकडून गुजरातलाच झुकते माप; महाराष्ट्राच्या मागणीकडे दुर्लक्षच

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ता.५ : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात 24 मार्चला लॉकडाऊन करण्यात आलं. होत. त्यानंतर तीनवेळा लॉकडाऊन वाढवण्यात आले. आता सर्व व्यवहार पुन्हा सुरू करताना गोंधळ होऊ नये यासाठी हळहळू नियम शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, याकाळात देशात अनेक ठिकाणी कामगार, पर्यटक, विद्यार्थी अडकून पडले होते. या अडकलेल्या लोकांना सोडण्यासाठी रेल्वेनं 4231 श्रमिक विशेष रेल्वे आतापर्यंत सोडल्या. या गाड्यांमधून परराज्यात अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. 

रेल्वे विभागाकडून ‘सकाळ’ ला श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांबद्दल माहिती मिळाली आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशात आतापर्यंत 231 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यापैकी 4165 गाड्या त्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. तर अजुन 69 गाड्या धावत आहेत. 

रेल्वेने सोडलेल्या गाड्यांमध्ये महाराष्ट्राला झुकतं माप देऊन उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातला जास्त गाड्या दिल्याचं समोर आलं आहे. गुजरातला 1026 गाड्या देण्यात आल्या तर महाराष्ट्रातून 802 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. 

देशात सर्वाधिक गाड्या या उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सोडण्यात आल्या आहेत. देशातील विविध भागातून उत्तर प्रदेशात 1695 तर बिहारमध्ये 1519 गाड्या सोडण्यात आल्या.  याशिवाय झारखंड (202), पश्चिम बंगाल (190), ओडिसा (206), मध्य प्रदेश (128) आणि आसामला (53) श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्या. 

महाराष्ट्रातून आतापर्यंत 802 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या असून यातील सर्वाधिक रेल्वे उत्तर प्रदेशात गेल्या. महाराष्ट्रात विविध भागात अडकून पडलेल्या कामगारांना उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी आतापर्यंत 423 रेल्वे सोडण्यात आल्या. त्याशिवाय बिहारला 193 तर पश्चिम बंगालला 45 विशेष रेल्वे गाड्या गेल्या. मध्य प्रदेश (34), झारखंड (28), आंध्र प्रदेश (3), आसाम (7) तर मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, चंदीगड, गुजरात, हिमाचल, केरळ आणि कर्नाटकला प्रत्येकी 2 गाड्या सोडण्यात आल्या. ओडिसा (16), तेलंगणा (8) उत्तराखंड (4) इथं महाराष्ट्रातून श्रमिक विशेष रेल्वे गाड्या पाठवण्यात आल्या. 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राकडून रेल्वे देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी राज्य सरकारने ट्रेनची मागणी केल्यानंतर टाळाटाळ केली जाते. जेव्हा तेच मजुर रस्त्यावर झोपतात तेव्हा विरोधक आमच्यावर उलटे आरोप करतात असंही ते म्हणाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT