children due to death
children due to death
देश

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची करु शकता मदत

सकाळ ऑनलाइन

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे (Covid19) असंख्य जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक लहानग्यांनी त्यांच्या आई-वडिलांना गमावल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे अशा प्रसंगामुळे अनेक चाइल्ड केअर सेंटर्स (Child Care Centers),चाइल्ड हेल्पलाइन (Child Helpline) स्वयंसेवी संस्था (NGO) या अनाथ मुलांसाठी सातत्याने झटत आहेत. मात्र, समाजाचा एक भाग म्हणून अनेक जण या अनाथ मुलांना दत्तक घेण्याचादेखील प्रयत्न करत आहेत. परंतु, या मुलांना दत्तक घेण्यापूर्वी काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. सोबतच लहान मुलांची होणारी तस्करी थांबवण्यासाठी आपण समाजाचा एक भाग म्हणून लक्षण देणं गरजेचं आहे. (covid 19 pandemic homeless orphaned children death of parents child care)

कोरोनामुळे अनेक लहान मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना गमावलं आहे. त्यामुळे या पोरक्या झालेल्या लहान मुलांना दत्तक घेतलं तर त्यांना पुन्हा एक नवीन कुटुंब मिळेल आणि ज्यांचं कुटुंब अपूर्ण होतं त्यांचं कुटुंबदेखील पूर्ण होईल. म्हणूनच कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेणं हा कुटुंब परिपूर्ण करण्यासोबत समाजकार्य करण्याचा उत्तम मार्ग असल्याचं म्हटलं जात आहे.

बेकायदेशीररित्या होतीये मुलांची तस्करी?

तुम्ही जर कोविडमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना दत्तक घ्यायचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जरुर लक्ष द्यायला हवं. कारण, सध्याच्या काळात अनेक लहान मुलांची बेकायदेशीरित्या तस्करी करण्यात येत आहे. तुम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून मुलांना दत्तक घेत आहात. ती संस्था रजिस्टर आहे की नाही. मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया योग्य आहे की नाही हे तपासून पाहा. नाहीतर, जर मुलांची तस्करी होत असेल किंवा तुम्ही बेकायदेशीरित्या मुलांना दत्तक घेतलं. तर तुम्हाला ते नक्कीच महागात पडू शकतं.

भारतात प्राचीन काळापासून मुलांना दत्तक घेतली जातात. भगवान श्रीकृष्णालादेखील दत्तक घेण्यात आल्याचं पौराणिक कथांमध्ये सांगण्यात येतं. पूर्वी कुटुंबामध्येच मुलांना दत्तक घेतलं जात होतं. मात्र, संस्था किंवा अन्य ओळखीच्या व्यक्तींकडूनही मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं आहे.

भारतामध्ये CARA (Central adoption resource authority) नुसार लहान मुलांना दत्तक घेण्याविषयीच्या प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला मूल दत्तक घ्यायचे असल्यास सर्वात प्रथम www.cara.nic.in या संकेत स्थळावर जाऊन संपूर्ण माहिती वाचून घेणे गरजेचे आहे. येथे देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच आपण एखाद्या मुलाला दत्तक घेऊ शकतो. तसंच तुमच्या घरचं वातावरण, परिस्थिती हे पाहिलं जातं. सोबतच लहान मुलाचं मानसिक, शारीरिक स्वास्थदेखील तपासलं जातं.

अनाथ/ बेघर मुलं दिसल्यास चाइल्डलाइन, पोलिसांशी संपर्क साधा

जर तुमच्या नजरेस लहान मुलं बेवारसरित्या फिरतांना आढळले तर त्वरीत जवळच्या पोलिस स्टेशन किंवा चाइल्डलाइनशी संपर्क साधा. कारण, जर चुकीच्या व्यक्तींच्या हाती ही मुलं लागली तर त्यांची तस्करी होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच ते व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यतादेखील तितकीच आहे. त्यामुळे लहान मुलं बेवारसरित्या फिरतांना दिसल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधा. तसंच १०९८ या क्रमांकावर फोन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : केएलच्या संथ फलंदाजीवर निकोलसचा आक्रमक उतारा; मुंबईसमोर ठेवलं 215 धावांचे आव्हान

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT