Corona Vaccine Dose Sakal
देश

Covid 19 Vaccination : बुस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे; मोफत लसीकरण अभियान समाप्त

जुलैपासून बुस्टर डोस मोफत देण्यात येत होता.

सकाळ डिजिटल टीम

लसीकरण, निर्बंध या सगळ्यानंतरही अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आहे. ही लस देशवासियांना मोफत दिली जात आहे. पहिल्या दोन लसमात्रांसह बुस्टर डोसही मोफत देण्यात आला. मात्र यापुढे या डोससाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ दिवस बुस्टर डोस मोफत देण्यात येणार होता. हे अभियान शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी संपलं आहे. या काळामध्ये जवळपास १६ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये या अभियानाला सुरुवात झाली होती. या ७५ दिवसीय अभियानाला सुरुवात होण्याआधी फक्त ८ टक्के प्रौढांनी बुस्टर डोस घेतला होता. मात्र आज हे अभियान संपल्यानंतर ही संख्या २७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

मात्र अजूनही देशातल्या तीन चतुर्थांश प्रौढ लोकसंख्येचं सलीकरण बाकी आहे. आजपासून म्हणजे ऑक्टोबर २०२२ पासून कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेण्यासाठी शुल्क द्यावं लागणार आहे. बुस्टर डोसच्या शुल्काविषयी, ते मोफत दिलं जाणार की नाही, याविषयी अद्याप कोणतेही निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले नाहीत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या ७५ दिवसांमध्ये देशात १३ लाखच्या आसपास लसीकरण शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बहुतांश शिबिरं सरकारी आणि खासगी ऑफिसेस तसंच धार्मिक यात्रांच्या मार्गावरील आरोग्य कँम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT