देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान केंद्र सरकारने दि. 1 मे पासून 18 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.  
देश

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस; रजिस्ट्रेशन कसं करायचं?

आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. सोमवारी 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेतला असून लस निर्मात्यांकडून थेट राज्यांना विकता येणार आहे. मात्र हे प्रमाण 50 टक्के असेल. याआधी दोन टप्प्यात लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात लस कमी पडू नये यासाठी लस खरेदीच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. तसचं राज्यांना आता थेट लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अतिरिक्त डोस विकत घेता येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी रजिस्ट्रेशनला दोन दिवसात सुरुवात होणार आहे. CoWin अॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल. दरम्यान, कालच सीरम इन्स्टिट्यूटने लशीचे डोस आणि त्याची किंमत यांची माहिती दिली होती. राज्यांना लस 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांमध्ये लस दिली जाणार आहे. केंद्रासाठी मात्र 150 रुपये इतकीच किंमत राहील.

सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या कोविड 19 लसीकरण केंद्रावर लस मोफत देण्यात येईल. तर खासगी रुग्णालयात पारदर्शकपणे लशीसाठी सेल्फ सेट कॉस्टची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत लस घेण्यासाठी CoWIN अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.

रजिस्ट्रेशन कसं करायचं?

CoWIN चे अधिकृत संकेतस्थळ cowin.gov.in वर तुम्हाला मोबाइल क्रमांक किंवा आधार नंबर द्यावा लागेल.

तुमच्या मोबाइलवर त्यानंतर एक ओटीपी येईल तो सबमिट करावा लागेल.

लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेल्या लोकांची नावे दिसतील.

तुम्हाला लस कधी घ्यायची, कोणत्या वेळेत घ्यायची हे निश्चित करता येतं.

त्यासाठी नावाची यादी येते त्यासमोर कॅलेंडर दिसतं. तिथं तारीख निवडता येते.

त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, शहर, वॉर्ड, पिन नंबर याची माहिती द्या.

कोणती कागदपत्रे लागतात?

लसीकरणासाठी नोंदणी करत असताना तुमच्याकडे ओळखपत्र हंव.

ओळखपत्रावर तुमचा फोटो असायला हवा.

कोविन अॅपवर नोंदणी करताना केवायसी ओळखपत्र स्कॅन करून जोडावं लागतं.

आधार कार्ड

पॅन कार्ड

मतदान ओळखपत्र

ड्रायव्हिंग लायसन

कामगार मंत्रालयाने दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

MGNREGA जॉब कार्ड

पासपोर्ट

बँक / पोस्ट ऑफिसचे पासबुक

पेन्शनची कागदपत्रे

लसीकरणानंतर काय?

लस घेतल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी मिळेल.

रेफरन्स आयडीवरून लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT