rt pcr test  Google
देश

Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य

वाढत्या कोरोना बाधितांनी पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

RT-PCR Test On Airport : जगभरातील काही देशांमध्ये वाढत्या कोरोना बाधितांनी पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

जगातील वाढती कोरोनाची प्रकरणे पाहता भारतासह अनेक देशांनी सावध भूमिका घेत त्या अनुशंगाने पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, आज आरोग्य मंत्रालयाकडून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केली आहेत.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंगच्या ७२ तास आधी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीननं पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अक्षरक्षः थैमान घातले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात २० डिसेंबरपर्यंत चीनमधील सुमारे २० टक्के लोकसंख्येला या विषाणूचा फटका बसला आहे. चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येचा ताण येथील आरोग्य सेवेवर झाला असून, रूग्णालयांमध्ये उपचारांसाठी मोठी वेटिंग आहे.

भारत सरकार सतर्क

दरम्यान, चीनसह काही देशांमधील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता यापूर्वीच केंद्र सरकारकडून नागरिकांना कोरोना नियमांचे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संभव्य धोका लक्षात घेता काही दिवसांपूर्वी देशभरात आरोग्य सेवेशी संबंधित मॉक ड्रिलदेखील करण्यात आले होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील उच्चस्तरीय बैठक घेत कोरोनाचा आढावा घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT