Covid 19 Rule
Covid 19 Rule Sakal
देश

नियमांचे पालन अत्यावश्‍यकच : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

सकाळ वृत्तसेवा

Delhi News : ‘डेल्टा’पेक्षा कित्येक पटींनी वेगाने पसरणाऱ्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron variant) या नव्या कोरोना व्हेरियंटची भारतातील रूग्णसंख्या (Patient)अवघ्या आठवडाभरात ४०० च्या घरात पोचली आहे. लसीकरण (Vaccination) आवश्यकच आहे, पण ‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी बूस्टर डोस (Booster Dose) हा एकमेव उपाय ठरू शकत नाही, या जागतिक आरोग्य संघटनेच्या मताशी सहमती दर्शवत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, नियमांचे प्रत्येकाने कसोशीने पालन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी आज पत्रकार परिषद घेत देशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा वेगाने पसरणारा आहे. विशेषतः ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना फार पटकन संसर्ग होतो. ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा वेग पाहता आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर आहे. त्यामुळे, गर्दी करणे, आरोग्य नियम न पाळणे हे सारे तत्काळ सोडून देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. देशांतील १७ राज्यांत सध्या ३५८ ओमिक्रॉनबाधित असून रूग्ण आहेत आणि त्यापैकी ११४ बरे झाले आहेत. संसर्ग झालेल्यांपैकी ८७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तर तिघांनी बूस्टर डोसही घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रवास बंदी नाही

सरसकट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास बंदीला जागतिक आरोग्य संघटनाही अनुकूल नाही, असे सांगून भूषण यांनी तशा प्रस्तावाबाबत भारत अनुत्सुक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपण संसर्गाच्या बाबतीत देशांची ‘धोका असलेले’ आणि ‘धोका नसलेले’ अशी दोन गटांत विभागणी केली आहे. त्यानुसार विदेशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबतचे धोरण आखले जात आहे.

नियमपालनाची जबाबदारी राज्यांची

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत सुरू झालेल्या बड्या नेत्यांच्या निवडणूक सभा आणि त्यातील प्रचार हा ‘सुपर स्प्रेडर’ ठरणार का? या सभा टाळण्यासाठी काय उपाययोजना प्रस्तावित आहेत, असे भूषण यांना विचारण्यात आले. गर्दीच्या नियोजनाची व आरोग्य नियमांच्या पालनाची जबाबदारी संबंधित राज्यांची असल्याचे सांगून केंद्र सरकारने हात झटकले आहेत. गर्दीबाबत केंद्राने २१ डिसेंबरला राज्य सरकारांना दिलेले दिशानिर्देश स्पष्ट आहेत व त्यात, जबाबदारी संबंधित जिल्हा प्रशासनाची असल्याचे नमूद केले आहे, असेही भूषण यांनी निदर्शनास आणून दिले.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी केंद्राने जय्यत तयारी ठेवल्याचे सांगून आरोग्य सचिव भूषण म्हणाले की, सध्या १८ लाख विलीनीकरण बेड आणि चार लाख ९४,३१४ ऑक्सिजन सिलिंडर जोडलेले बेड उपलब्ध आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा साठा असून रोज १८ हजार मेट्रिक टन उत्पादनाची क्षमता देशाने विकसित केली आहे.

ओमिक्रॉनच्या धास्तीने...

  • उत्तर प्रदेश आणि हरियानामध्ये रात्रीची संचारबंदी लागू

  • गुजरातमध्ये आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

  • गोव्यात कोरोना टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक

  • देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३५८ वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT