Omicron Virus
Omicron Virus e sakal
देश

देशात सध्या ओमिक्रॉनचे कुठे आणि किती रुग्ण? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतासहित जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला 'ओमिक्रॉन' हा हातपाय पसरतो आहे. हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आज दिवसभरात देशात ओमिक्रॉनने बाधित अनेक रुग्ण सापडले आहेत. आज देशाची राजधानी दिल्लीमध्येही रुग्ण सापडले आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पुण्यात देखील काही रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. याआएधी गुजरातमधून एक, महाराष्ट्रातून एक आणि कर्नाटकातून दोन ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले होते. मात्र, आता या रुग्णसंख्येत आजच्या दिवशी वाढ झाली आहे.

देशात आतापर्यंत कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे एकूण 21 रुग्ण सापडले आहेत. राजस्थानमध्ये नऊ, महाराष्ट्रात आठ, कर्नाटकात दोन आणि गुजरात आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक असे रुग्ण सापडलेआहेत.

राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचे नऊ रुग्ण

राजस्थानमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या कुटुंबामधील नऊ लोकांना ओमिक्रॉनने बाधित केलं आहे. या सगळ्यांना याआधीच आरयूएचएसमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या संपर्कात आलेले इतर पाच जण देखील संक्रमित आढळलेले आहेत. त्यांना देखील भरती करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात आठ लोक ओमिक्रॉनबाधित

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉननं आता महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. कारण डोंबिवलीपाठोपाठ पुणे आणि पिंपरीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं पुणेकरांच्या चिंतेतही भर पडली आहे. यामुळं महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Kiran Mane: "सुषमा अंधारेताईंनी हा पर्दाफाश केला तेव्हा...", राज ठाकरेंच्या व्हायरल पत्राबाबत किरण मानेंची पोस्ट; नेत्यांना म्हणाले...

Weather Update: पुणे, मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पाऊस लावणार हजेरी; तर उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

लहान मुलांना सारख्या उचक्या का येतात? जाणून घ्या कारण आणि उपाय

SCROLL FOR NEXT