Corona Vaccine Corona Vaccine
देश

१६ वर्षीय मुलाला दिली कोविशील्ड; वडिलांची प्रशासनाकडे तक्रार

मुलाला लसीकरण करताना चुकून कोविशील्ड लस दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोनाचे (coronavirus) रुग्ण अचानक वाढायला सुरुवात झाली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर बालकांना ही लस दिली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लसीकरणाबाबत मोठे दुर्लक्ष झाले. एका १६ वर्षीय मुलाला चुकीची लस देण्यात (Covishield given to 16 year old boy) आली. ही घटना नाशिक जिल्ह्यात (nashik) घडली.

मुलाला लसीकरण करताना चुकून कोविशील्ड (Covishield) लस दिल्याचे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी योला तहसीलच्या पाटोदा गावातील स्थानिक आरोग्य केंद्रात झालेल्या गैरसमजामुळे या मुलाला कोवॅक्सीनऐवजी (Covaxin) कोविशील्डने लसीकरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते की, केवळ १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाच कोवॅक्सीन दिली जाईल.

वडिलांनी तक्रार दाखल केली

हा प्रकार मुलाच्या वडिलांना कळताच प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर तहसील आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी पाटोदा आरोग्य केंद्राला भेट दिली. चुकीने असे घडल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुलाची प्रकृती आता ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांनंतर तो लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT