covishield
covishield 
देश

कोविशिल्डचा पहिला डोस डेल्टा व्हेरिएन्टवर किती प्रभावी?

कार्तिक पुजारी

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. असे असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 28 कोटी लोकांना कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यातच कोविडिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधीच्या मुद्दावरुन वाद निर्माण झालाय. पण, केंद्राने स्पष्ट केलंय की तज्ज्ञांच्या सल्यानुसारच कोविशिल्ड लशींच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. (Covishield Single Dose 61 percent Effective Against Delta Covid Panel Chief)

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरपर्सन डॉ. एन के अरोरा यांनी याच संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. चाचणी घेतल्यानंतर अभ्यासाअंती दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस डेल्टा प्रारुपाविरोधात 61 टक्के प्रभावी असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. कोरोना विषाणू सातत्याने आपलं रुप बदलत आहे. त्याचे डेल्टा प्रारुप अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय. त्यात डॉ. एन के अरोरा यांनी दिलेल्या माहितीमुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

डॉ. एन के अरोरा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, सुरुवातीला कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा होता. चाचणीदरम्यान आलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. असे असले तरी कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी 12 ते 16 आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय देशात ज्या चाचण्या घेण्यात आल्या, त्यानुसार योग्य आहे. अभ्यास करण्यात आल्यानंतरच दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आलाय.

सुरुवातीला दोन डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा करण्यात आला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार हा कालावधी वाढवून 6 ते 8 आठवडे करण्यात आला. त्यानंतर पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या सल्ल्यानंतर हा कालावधी आणखीन वाढवून 12 आठवडे करण्यात आला. 12 आठवडयानंतर दुसरा डोस दिल्यानंतर लस 65 ते 80 टक्के प्रभावी राहत असल्याचं सांगण्यात आलं होतं. देशात डेल्टा पारुपाचा संसर्ग वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. डॉ एन के अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, डेल्या प्रारुपाच्या हजारो प्रकरणाचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दिसून आलं की कोविशिल्डचा पहिला डोस यावर 61 टक्के प्रभावी आहे, तर याचे दोन्ही डोस 65 टक्के प्रभावी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT