BJP MLA Suman Haripriya 
देश

गोमुत्र आणि शेणामुळे कोरोनावर होऊ शकतो उपचार; भाजप आमदाराचा दावा

वृत्तसंस्था

गुवाहाटी : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचा प्रय़त्न करत असताना दुसरीकडे आसाममधील भाजप आमदाराने गोमुत्र आणि शेणाचा वापर करून औषध बनविल्यास कोरोना रोखण्यात मदत होईल असा दावा केला आहे.

आसाममधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी आज (मंगळवार) विधानभवनात बोलताना असा दावा केला. सुमन हरिप्रिया म्हणाल्या, की गोमुत्र आणि शेणामुळे कॅन्सरसारख्या धोकादायक आजार बरे होऊ शकतात. गोमुत्र आणि शेणाचे फायदे आपल्या सगळ्याला माहिती आहेत. गोमुत्राचा वापर आपण परिसरातील शुद्धीकरणासाठीही करतो. त्यामुळे मला वाटते की गोमुत्र आणि शेणामुळे कोरोनासारखा आजारही बरा केला जाऊ शकतो.

चीनमधील वुहान शहरातून या व्हायरसचा प्रसार झाला असून, आतापर्यंत 3 हजारांहून अधिक जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. तर, 80 हजारांहून अधिक जणांना या रोगाची लागण झालेली आहे. जगभरातील सुमारे 60 देशांमध्ये या रोगाचे रुग्ण आढळले आहेत. भारतातही या रोगाचे काही रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर! पीएसआय पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट; एक संधी देण्याची मागणी

PMC Election: पुण्यात भाजप कुणाला उमेदवारी देणार? निष्ठावंतं की नेत्यांच्या मर्जीतील? मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीची Inside Story

Kolhapur : आजऱ्यात मध्यरात्री अग्नितांडव, ७ चारचाकी गाड्यांसह दुकानं जळून खाक; कोट्यवधींचे नुकसान

अजितदादा गेले कुठं? दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटल्यानंतर पोलीस ताफा न घेता एकटेच निघाले

Latest Marathi News Live Update : भाजपच्या धक्क्यानंतर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये, आजपासून प्रचाराला सुरुवात; महाविकास आघाडीची घोषणा होणार?

SCROLL FOR NEXT