New Jamtara KALINGA
देश

New Jamtara : नवीन जामतारा उघड! ५ हजार पोलिसांकडून १४ गावांमध्ये छापेमारी; १२५ जणांना अटक!

Sandip Kapde

New Jamtara : देशातील सायबर फसवणुकीचे केंद्रस्थान म्हणून 'नवीन जामतारा ' म्हणून कुख्यात असलेल्या भागाला या आठवड्यात पहिला मोठा धक्का बसला. हरियाणा पोलिसांनी गुरुवार आणि शुक्रवारी १२५ संशयितांना ताब्यात घेतले. झारखंडच्या जामतारा नंतर सायबर ठगांचे नवे हॉट स्पॉट बनलेल्या मेवातमधील सायबर ठगांवर गुरुवारी दुपारी ३ ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत छापेमारी करण्यात आली.

नूहच्या पुन्हाणा शहरातील बिछोर पोलीस स्टेशन हद्दीतील १४ गावांमध्ये ३०० ठिकाणी ५ हजार पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी १२५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करून पडताळणी केली जात आहे.

खेडला, लुहिंगा खुर्द, लुहिंगा कलान, गोकलपूर, गोडोला, अमीनाबाद, महू, गुलालता, जैमत, जाखोपूर, नई, तिरवारा, मामलिका आणि पापडा या गावांमध्ये छापे टाकण्यात आले.

सायबर आणि इतर गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना लक्ष्य करून हा छापा टाकण्यात आला. प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे अन्य राज्यातील सायबर गुन्हेगारांशीही संबंध असल्याचे समोर आले असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

डीआयजी एसटीएफ सिमरदीप सिंग आणि नूहचे एसपी वरुण सिंगला यांनी शुक्रवारी दुपारी एसटीएफच्या भोंडसी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन छाप्याची माहिती दिली.

सिमरदीप सिंग म्हणाले, ऑपरेशनचे नियोजन करण्यासाठी एक महिना लागला. या छाप्यांमुळे त्यांच्या कारवाया बंद होतील. यामुळे हरियाणातही सायबर फसवणुकीची संख्या कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT