Republic Day Fashion esakal
देश

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाचा आउटफिट शोधताय? इथे आहेत २०० रुपयांच्या आतले ड्रेसेस

आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा अनेक स्टायलिश गोष्टी तुम्हाला सहज इथे मिळतील.

सकाळ डिजिटल टीम


प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक सेलेब्रिटी आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर आपला तिरंगा लूक तयार करत असतात; या दिवशी तुम्हीही असा आपला लूक तयार करून छान फोटोशूट करू शकतात, पण अर्थात असा लूक करायचं म्हटलं तर त्याला खूप खर्च करावा लागतो. 

पण जर तुम्हाला पॉकेट फ्रेंडली आउटफिट तयार करायचा असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकतात. मोठमोठ्या दुकानात किंवा मॉलमध्ये जाऊन महागडे कपडे घेण्यापेक्षा तुम्ही तुळशीबागेत जाऊ शकतात

तुळशीबाग म्हटलं की छान-फॅशनेबल कपडे, सुंदर ज्वेलरी आणि इतरही खूप स्टायलिश गोष्टी आल्याच. तरुणींसाठी इथे विशेष आकर्षण असतं. शिवाय आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा अनेक स्टायलिश गोष्टी तुम्हाला सहज इथे मिळतील.

प्रजासत्ताक दिनानिमित्तही तुळशीबागेत अशाच अनेक गोष्टी आल्या आहेत, या गोष्टींची किंमत २०० रुपयांच्या आत आहे. आपला पूर्ण लुक तुम्ही फक्त ५०० रुपायांमध्ये क्रिएट करू शकतात, आणि हे कपडे तुम्ही प्रजासत्ताक दिनानंतरही वापरू शकतील असेच आहेत. 

१. चिकनकरीचे पांढरे कुर्ते: चिकनकरीचे कुर्ते सगळ्यांनाच आवडतात, १५० ते २०० रुपायांमध्ये तुम्हाला इथे हे कुर्ते सहज मिळतील. चिकनकरीचे कुर्ते त्यावर बारीक एम्ब्रोडरी खूप सुंदर दिसते, यात तुम्ही लॉन्ग, शॉर्ट किंवा कट नसलेले लॉन्ग कुर्तेसुद्धा घेऊ शकतात. 

२.प्लाजो:  कुर्ते तसे नेहमीच तुळशीबागेत असतात, पं सध्या इथे नवीन नवीन प्लाजो सध्या आलेले आहेत, या प्लाजो तुम्हाला २०० रुपयात इथे मिळतील; जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची हवी असेल तर तशी नाहीतर तुम्ही हिरव्या रंगाचीही प्लाजो घेऊ शकतात. 

३. तिरंगा स्टाइल ओढणी: तिरंगा स्टाइल ओढणीवर आपल्या तिरंग्याच्या रंगांनी कलर आहे, त्यामुळे फार काही फॅशनेबल गोष्टी नाही केल्यातरी चालतील. १०० रूपयांपर्यंत ही ओढणी उपलब्ध आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT