Badaun Double Murder Case Esakal
देश

Badaun Double Murder Case: 'पत्नी आजारी आहे, 5000 रुपये द्या', आरोपीने मुलांच्या आईकडे मागितली होती मदत; बदायूं हत्याकांडात नवीन अपडेट समोर

Badaun Double Murder Case: बदायूंतील दुहेरी हत्याकांडातील आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी मुलांच्या आईकडे आर्थिक मदत मागितली होती. पत्नी आजारी आहे, त्यामुळे त्याला पाच हजार रुपये द्या, अशी विनंती आरोपीने आधी केली होती. पतीशी फोनवर बोलल्यानंतर मुलांच्या आईने साजिदला पैसे देखील दिले होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Badaun Double Murder Case: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एका व्यक्तीने तीन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना याची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी आरोपीचा पाठलाग केला. यात आरोपीचा एनकाऊन्टर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. साजिद जेव्हा मुलांना मारण्यासाठी घरात घुसला तेव्हा त्याने त्यांच्या आईकडून पैसे उसने मागितल्याचे समोर आले आहे.

ही घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत घडली. मंडी पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा साजिद नावाचा व्यक्ती विनोद सिंग यांच्या दुकानासमोरील घरात घुसला. यावेळी त्याने विनोदच्या पत्नीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.

मुलांच्या आईने काय सांगितले?

मुलांची आई संगीता म्हणाली, "मी माझ्या घरात कॉस्मेटिकचे दुकान चालवते आणि वर माझे पार्लरचे दुकान आहे. संध्याकाळी साजिद घरी आला आणि त्याने आधी क्लचर्स मागितले, त्यानंतर काही वेळाने, त्याने 5000 रुपयांची मदत मागितली. मी माझ्या पतीशी बोलून त्याला 5000 रुपये दिले. त्यानंतर त्याची तब्येत बरी नसल्याचे सांगून तो घरच्या गच्चीवर गेला. आयुष आणि युवराज ही दोन्ही मुलं गच्चीवर होती. मुलांच्या आजीने सांगितले की, साजिदने हनीला पाणी घेऊन वरती बोलावले होते. हनी पाणी घेऊन वरती गेला होता आणि काही वेळाने किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि साजिद हातात मोठा चाकू होता. तो रक्ताने माखला होता तसाच साजिद खाली येत होता.

मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला : आजी

मुलांच्या आजीने सांगितले की, सायंकाळी उशिरा सलूनचे दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीने घरात घुसून आयुष, युवराज आणि आहान उर्फ ​​हनी या तीन मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये आयुष (12) आणि अहान (6) यांचा मृत्यू झाला आहे, तर युवराजला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या घटनेने संतप्त कुटुंबीय व ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला. आरोपी साजिदच्या दुकानाला आग लावली आणि त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. एसएसपीसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि गर्दीवर नियंत्रण मिळवले.

बरेली झोन ​​आयजींनी काय माहिती दिली?

बरेली झोनचे आयजी राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, दोन मुलांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रक्ताने माखलेला आरोपी साजिद घटनास्थळावरून पळून गेला. त्याची माहिती मिळताच आमच्या पथकाने त्याचा पाठलाग केला असता तो शेकुपूरच्या जंगलात दिसला. आमची एसओजी आणि पोलिस स्टेशन त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी होऊन मरण पावला.

या घटनेतील एकमेव आरोपी : आय.जी

आयजीच्या म्हणण्यानुसार या घटनेत साजिद हा एकमेव आरोपी होता. एक व्यक्ती रक्ताने माखलेला पळत असल्याचे लोकांनी सांगितल्यावर त्याचा पाठलाग करण्यात आला. या घटनेमागची कारणे शोधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्यवहार आहे की आणखी काही वैमनस्य आहे, याचा कसून तपास सुरू आहे. त्याने सांगितले की, सध्या कुटुंब दु:खी आहे त्यामुळे ते त्याच्याशी जास्त बोलत नाहीत.

चकमकीत पोलीस स्टेशन प्रभारीलाही लागली गोळी

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी घरात जाऊन प्रथम मुलांच्या आजीला भेटले आणि नंतर दुसऱ्या मजल्यावर जाऊन तीन मुलांवर हल्ला केला, यात दोन मुलांचा मृत्यू झाला आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला. या चकमकीत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे प्रभारी गौरव बिश्नोई यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हत्येचं कारण अस्पष्ट

दोन्ही मुलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार आरोपीचा पोलिसांना पाठलाग केला. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. यात आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बरेलीचे आयजी राकेश कुमार यांनी यासंदर्भात सांगितलं की, घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने गोळीबार सुरु केला. कारवाईमध्ये आरोपीचा मृत्यू झालाय. आरोपी २५ ते ३० वर्षे वयाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT