bihar crime news Sakal
देश

ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरावर धाड, कागदपत्रांसह सापडले सोन-चांदी

बिहारमधील ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली आहे.

अनेकवेळा आपण पोलिसांनी किंवा पोलिस कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याच्या घटना वाचल्या आहेत. दरम्यान, आता बिहारमधून अशीच एक घटना समोर येत आहे. बिहारमधील ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली आहे. या कारवाईत विभागाने नोटांनी भरलेले पाच पोते, कागदपत्रांसह, सोने- चांदीचे दागिने, चार कार आणि काही बँकांचे एटीएम जप्त केले आहेत. (bihar crime news)

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, बिहारमधील ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली आहे. दक्षता विभागाचे पथक कुमार यांच्या घरी पोहचले असता त्यांनी एक खोली उघडली. या खोलीत चार कोटी रुपये किमतीच्या नोटा पाच पोत्यांमध्ये भरुन ठेवल्या होत्या. तर, अडीच किलो चांदी आणि अर्ध्या किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आढळले आहेत. दरम्यान, छाप्यात सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आलं होतं.

या छाप्यात मालमत्तेचीअनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. जलालपूर शहरात एक फ्लॅट, जहानबादमध्ये घर व जमिनीची कागदपत्रे पथकाच्या हाती लागले आहेत. तर, पाटणा, रांचीमध्ये त्यांचा एक फ्लॅट असल्याचा संशय असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

या धाडीदरम्यान, ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्याविरोधात दक्षता विभागाने बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर दक्षता विभागाने ही कारवाई केली आहे. या पथकाने करोडोंची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्याविरोधात दक्षता विभागाने बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, डीएसपी सुरेंद्र कुमार मौआर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी जितेंद्र कुमारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र कुमार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली असून आरोपी कुमार सध्या फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT