Bhopal Madhya Pradesh Crime News esakal
देश

Crime News : JCB चालकाचा 17 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार, पोटात दुखू लागल्यामुळं घटना आली समोर

गावात आल्यानंतर अचानक मुलीची प्रकृती ढासळू लागली. नातेवाइकांनी तिला रुग्णालयात नेलं.

सकाळ डिजिटल टीम

मजूर कामात व्यस्त असताना नरेंद्रनं मुलीला घराच्या निर्जन भागात नेलं. तिथं त्यानं मुलीवर बलात्कार केला.

भोपाळ : राजधानीतील छोला मंदिर पोलीस ठाण्यात (Chhola Mandir Police Station) आदिवासी मुलीच्या (Tribal Girl) तक्रारीवरून जेसीबी चालकावर (JCB Driver) बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. झाबुआच्या थांदला पोलीस ठाण्यात (Thandla Police Station) तक्रार करण्यात आलीये. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

छोला मंदिर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, 17 वर्षीय तरुणी झाबुआ जिल्ह्यातील थांदला पोलिस स्टेशन परिसरात राहते. तिचे कुटुंबीय वेगवेगळ्या शहरात मजूर म्हणून काम करतात. काही महिन्यांपूर्वी तिच्या गावातील अनेक लोक राजधानीत कामासाठी आले होते. छोला मंदिर परिसरातील भानपूर परिसरात ते एका बांधकाम सुरू असलेल्या घरात काम करत होते.

काम करत असताना या तरुणीची घटनास्थळी जेसीबी चालवणाऱ्या नरेंद्र यादव नावाच्या तरुणाशी ओळख झाली. 6 जानेवारी रोजी उर्वरित मजूर कामात व्यस्त असताना नरेंद्रनं मुलीला घराच्या निर्जन भागात नेलं. तिथं त्यानं मुलीवर बलात्कार केला. त्याचवेळी घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीला गप्प केलं.

काही दिवसांनी सर्व मजूर आपापल्या गावी परतले. गावात आल्यानंतर अचानक मुलीची प्रकृती ढासळू लागली. नातेवाइकांनी तिला रुग्णालयात नेलं. तिथं तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. नातेवाइकांनी मुलीकडं विचारपूस केली असता, जेसीबी चालक नरेंद्र यादव तिच्यावर अत्याचार करत असल्याचं तिनं सांगितलं. यानंतर नातेवाईकांनी मुलीला सोबत घेऊन थांदला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT