supreme court  Sakal
देश

Supreme Court: "टीकात्मक विचार म्हणजे व्यवस्थेला विरोध नव्हे"; सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं केरळमधील एका वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : "सरकारच्या धोरणावर टीकात्मक विचार करणं म्हणजे व्यवस्थेला विरोध नव्हे," अशी महत्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे. तसेच समाजासाठी माध्यम स्वातंत्र्य महत्वाचं आहे, असं सांगत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. 'मीडिया वन' या मल्याळम वृत्तवाहिनीचा सरकारनं परवाना रद्द केला होता. याबाबतच्या खटल्याच्या सुनावणीत कोर्टानं ही टिप्पणी केली आहे. (Critical views cant be termed as antiestablishment SC lifts Centre ban on Media One)

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयानं सकारविरोधात बातम्या दिल्यानं केरळमधील मीडिया वन या वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला होता. सरकारच्या या कारवाईविरोधात संबंधीत वाहिनीनं हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं सरकारचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर वाहिनीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली अन् सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेतली.

कोर्टानं या याचिकेवर सुनावणी करताना अनेक महत्वाच्या टिप्पण्या केल्या. कोर्टानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला चार आठवड्यात मीडिया वन वृत्त वाहिनीला नवा परवाना देण्याचे आदेश दिले. तसेच कोर्टानं यादरम्यान माध्यम स्वातंत्र्यावरही महत्वाची टिप्पणी करताना समाजासाठी आणि मजबूत लोकशाहीसाठी माध्यम स्वातंत्र्य महत्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.

मल्याळम न्यूज चॅनेलला सुरक्षा मंजुरी देण्यास नकार दिल्याबद्दलही सुप्रीम कोर्टानं केंद्रावर ताशेरे ओढले आहेत. कोर्टानं म्हटलं की, "केवळ हवेतच राष्ट्रीय सुरक्षेचा दावा केला जाऊ शकत नाही. त्याला समर्थन देणारी भौतिक तथ्ये असणं आवश्यक आहे,"

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

31 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारनं मल्याळम वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या वाहिनीचा परवाना रद्द केला होता. सरकारच्या निर्देशाविरोधात वाहिनीनं केरळ हायकोर्टात आव्हान दिले होतं, त्यावर कोर्टानं प्रसारण बंदीचा आदेश कायम ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT