criticism on Zomato and uber eats on social media
criticism on Zomato and uber eats on social media  
देश

अन्नाला धर्म नसतो! Zomato, Uber Eats ला नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याचे कारण देत ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोने दिलेले सणसणीत उत्तर बुधवारी नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले. "अन्नाला कुठलाही धर्म नसतो', याची आठवण झोमॅटोने संबंधित ग्राहकाला करून दिली. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या मूल्यांशी तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका कंपनीचे संस्थापक दीपेंदर गोयल यांनी घेतल्याने "झोमॅटो'वर सोशल मीडियात कौतुकाचा पाऊस पडला. 

तर काल उबर इट्सने या घटनेबाबत झोमॅटोला पाठिंबा दर्शवल्याचे ट्विट केले आणि नेटकऱ्यांनी उबर इट्सलाही धारेवर धरले आहे. यामुळे ट्विटरवर आधी #BoycottZomato हा ट्रेंड सुरू होता, तर आता #BoycottUberEats हा ट्रेंडही सुरू झाला आहे.   

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमित शुक्‍ला नावाच्या व्यक्तीने मंगळवारी रात्री काही ट्‌विट केले होते. मुस्लिम डिलिव्हरी बॉय बदलण्याची मागणी शुक्‍ला याने कंपनीकडे केली होती. मात्र, त्यास कंपनीने नकार दिला. त्यानंतर संबंधित ऑर्डर रद्द करण्याची मागणी शुक्‍ला याने केली; परंतु कंपनीच्या नियमांनुसार अशा प्रकारे ऑर्डर रद्द करता येणार नाही आणि रद्द केल्यास शुल्क आकारले जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरही वाद घालत शुक्‍ला याने ऑर्डर रद्द करण्यास सांगितले. हा घटनाक्रम शुक्‍ला याने ट्‌विटमध्ये नमूद केला आहे. तसेच, याबाबत वकिलाची मदत घेणार असल्याचेही शुक्‍लाने म्हटले आहे. 

"अन्नाला धर्म नसतो, असे धर्म सांगतो,' असे स्पष्ट करत झोमॅटोकडून ट्‌विट करण्यात आले. त्यानंतर कंपनीचे संस्थापक गोयल यांनीही ठोस भूमिका घेणारे ट्‌विट केले. ""आयडिया ऑफ इंडिया आणि देशातील विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. मूल्यांशी तडजोड करत व्यवसाय करण्याचे आमचे धोरण नाही,'' असे गोयल यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. त्यानंतर झोमॅटो आणि गोयल यांच्या या भूमिकांचे ट्‌विटरवर जोरदार स्वागत करण्यात आले. 

तुम्ही घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढला आहे. 
- ओमर अब्दुल्ला, जम्मू आणि काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री 

दीपेंदर गोयल यांना सलाम! तुम्ही भारताचा खरा चेहरा आहात! मला तुमचा अभिमान वाटतो. 
- एस. वाय. कुरेशी, माजी निवडणूक आयुक्त 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT