crocodile  
देश

मगरीने 8 वर्षांच्या मुलाला अख्ख गिळलं; संतप्त गावकऱ्यांनी मगरीला ठेवलं बांधून

सकाळ डिजिटल टीम

श्योपूर : मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये गावकऱ्यांनी मगरीला पकडून बाहेर काढले. त्यानंतर मगरीला दोरीने बांधून तोंडात काठी अडकवली. गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार गावातील एकाने मगरीला 8 वर्षाच्या मुलाला जिवंत गिळताना पाहिलं होतं. मगरीने पोटातून मुलाला बाहेर काढेपर्यंत मगरीला सोडणार नसल्याचं भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. हे प्रकरण रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेता गावातील आहे. (crocodile swallowed child news in marathi)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन्य विभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मगरीला गावकऱ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मगरीच्या पोटातून मूल बाहेर आल्याशिवाय मगरीला सोडणार नाही, यावर ग्रामस्थ ठाम होते. मात्र पोलीस आणि वनविभागाच्या समजूतीनंतर ग्रामस्थांनी मगरीला सोडले.

रिजेटा गावातील लक्ष्मण सिंह केवट यांचा ८ वर्षांचा मुलगा अतार सिंग सोमवारी सकाळी चंबळ नदीवर आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने मुलाला ओढून नदीत नेले. मुलाला नदीत नेते असताना तेथे आंघोळ करणाऱ्या गावातील इतर लोकांनी पाहिले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थ हातात काठ्या व जाळे घेऊन आले. गावकऱ्यांनी मगरीला जाळ्यात अडकवून दोरीने बांधून नदीबाहेर काढले आणि बंधून ठेवलं होते.

ग्रामस्थांनी सांगितले की, मुलाला मगरीने नदीवरील उपस्थितांच्या डोळ्यासमोर गिळले. मगरीच्या पोटातून मूल बाहेर येईल या आशेने ग्रामस्थ सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहात होते, पण असे झाले नाही. चंबळ नदीवर दिवसभर लोकांची गर्दी होती. मात्र वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या समजुतीनंतर गावकऱ्यांनी अखेर मगरीला सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

HP Laptop: एचपीचा प्रीमियम लॅपटॉप भारतात लाँच; तब्बल 160GB vRAM आणि जबरदस्त AI फीचर्ससह बाजारात एंट्री!

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

SCROLL FOR NEXT