Jama Mashid 
देश

दिल्ली : नुपूर शर्मांच्या निषेधासाठी जामा मशीदीजवळ उसळली गर्दी

नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधानाचं प्रकरण आद्याप शांत झालेलं नाही. हे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निषेधासाठी दिल्लीतील जामा मशिदीबाहेर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आंदोलक गोळा झाले आहेत. यावेळी नुपूर शर्मांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Crowds near Delhi Jama Masjid to protest against Napur Sharma)

या आंदोलनाबाबत माहिती देताना जामा मशीदीच्या शाही इमामांनी सांगितलं की, मशिदीच्यावतीनं या आंदोलनासाठी आवाहन करण्यात आलं नव्हतं. लोक आपणहून याठिकाणी आंदोलन करत आहेत. दरम्यान, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानं सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

भाजपच्या निलंबित खासदार निपूर शर्मा यांनी न्यूज चॅनेलवरील एका डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. यावरुन जगातील मुस्लिम देशांनी आक्षेप घेत भारताला सुनावण्याचे प्रकार घडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा वाद पोहोचल्यानं भाजपनं यावर स्पष्टीकरण देत आम्ही कुठल्याही धर्माचा आणि धर्म संस्थापकांचा सन्मान करतो. यानंतर त्यांनी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्लीच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन जिंदाल यांना पक्षातून तातडीनं निलंबित केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Pimpri News : भारतीय तरुणाला कंबोडियात बनवले ‘सायबर स्लेव्ह’; तब्बल चार महिने खोलीत डांबले

Education News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला नोंदणी आजपासून सुरू; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT