crpf jawan colleagues attended sisters wedding who was killed in Pulwama see photos here 
देश

बहिणीच्या लग्नाआधीच जवान शहीद; CRPF जवानांनी निभावलं भावाचं कर्तव्य

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही भावासाठी त्याच्या बहिणीचे लग्न ही मोठी गोष्ट असते, या लग्नात वेगवेगळ्या विधींसाठी थोरला भाऊ गरजेचा असतो. दरम्यान गेल्या वर्षी पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या बहिणीच्या लग्नात सोमवारी सीआरपीएफ (CRPF) जवानांनी हजेरी लावत मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडलं.

कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंह यांचा सीमेवर कर्तव्य बजावताना मृत्यू झाला तेव्हा ते केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 110 व्या बटालियनमध्ये (110th battalion of Central Reserve Police Force) ते तैनात होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कॉन्स्टेबल सिंग यांचे सहकारी उत्तर प्रदेशमध्ये त्यांची बहीण ज्योतीच्या लग्नासाठी आले आणि वधूच्या भावाचे कर्तव्य पार पाडले.

CRPF ने ट्विटरवर या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, या फोटोमध्ये लष्कराच्या गणवेशात असलेले जवान वधूला मंडपाकडे नेत असल्याचे दिसत आहे, हे काम सहसा मुलीचे भाऊ करतात. दरम्यान 'थोरले भाऊ म्हणून सीआरपीएफ जवान हे कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या बहिणीच्या लग्न समारंभाला उपस्थित होते, 110 बटालियन सीआरपीएफचे कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग यांनी 05/10/20 रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला शौर्याने प्रत्युत्तर देताना सर्वोच्च बलिदान दिले, असे देखील या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सीआरपीएफ जवानांनी वधूला आशीर्वाद दिले आणि लग्नात भेटवस्तू देखील दिल्या. याप्रसंगी शैलेंद्र प्रताप सिंह यांचे वडिल म्हणाले की, माझा मुलगा आता या जगात नाही, पण आता आमच्याकडे सीआरपीएफ जवानांच्या रूपात अनेक मुले आहेत जे नेहमी सुख-दु:खात आमच्या पाठीशी उभे असतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या बाहेरील महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या CRPF जवानांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते, तर पाच जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT