chatisgarh 
देश

जवानांनी गर्भवती महिलेला 6 किमी चालत पोहचविले रुग्णालयात

वृत्तसंस्था

विजापूर : छत्तीसगड जिल्ह्यातील विजापूर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी तब्बल सहा किमी पायपीट करत रुग्णालयात पोहचविले. जवानांच्या या कार्याचे सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

विजापूर जिल्ह्यात जंगल क्षेत्रात असलेल्या पडेडा गावात एका गर्भवती महिलेला सीआरपीएफच्या जवानांनी खाटेसह खांद्यावर घेत सहा किमी प्रवास केला. तिला रुग्णालयात पोहचविण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर आहे.

नुकताच काश्मीरमध्ये अशी घटना घडली होती. गुडघाभर बर्फातून जवान एका गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जात होते. चिनार कॉर्प्स या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर झाला होता. भारतीय लष्कराच्या या कार्याचे खूप कौतुक करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Paper Leak: 'पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही'; PM मोदींची मोठी घोषणा, कठोर कायदा आणणार; व्हिडिओ संदेशात नेमकं काय सांगितलं?

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर २६ दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT