दिल्ली : शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनी गृहपाठ न करणे सामान्य बाब आहे आणि कधीकधी पालक त्यांना शिक्षा करतात. पण दिल्लीत एका निष्पाप लेकराला गृहपाठ न केल्याने एका आईने क्रूर शिक्षा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आईने मुलीचे हातपाय बांधून मुलीला छतावर झोपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तव्यासारखी कडक तापलेल्या गच्चीवर पडलेली मुलगी वेदनेने किंचाळत राहीली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये एक मुलगी टेरेसवर हातपाय बांधलेली दिसत आहे. ती वेदनेने ओरडताना ऐकू येत आहे. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिच्या घरातून या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
हा व्हिडिओ करवल नगर भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, पोलिसांनी त्या भागात तपास केला. बराच तपास करूनही पोलिसांना तेथे अशी कोणतीही जागा सापडली नाही. नंतर समजले की हा व्हिडीओ तुकमीरपूर गल्ली क्रमांक २ चा आहे, जो खजुरी खास परिसरातील भाग आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपासानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, तिने शाळेचा गृहपाठ केला नव्हता, त्यामुळे तिला काही काळ शिक्षा झाली. 5-7 मिनिटांनी तीला काढण्यात आले. मात्र या मुलीला ज्याप्रकारे त्रास सहन करावा लागला त्यावरून, असा प्रश्न उपस्थित होत आहे की, या भीषण उन्हात वडीलधाऱ्यांचा देखील घाम गाळत असताना तिची आई या चिमुरडीला कडाक्याच्या उन्हात गच्चीवर कसे बसवू शकते. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.