Punjab Clashes  Sakal
देश

Patiala : हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सध्या दोन्ही पक्षांमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

पटियाला : पंजाबमधल्या पटियाला भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पतियाळा पोलिसांनी सांगितले की, हिंसाचाराच्या प्रकरणात एफआयआर देखील नोंदवला जाईल आणि अटक देखील केली जाईल. सध्या दोन्ही पक्षांमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पटियाला येथील संघर्षाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केले असून, घटनेनंतर आपण पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. तसेच परिसरात शांतता मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. राज्यात कोणालाही अशांतता निर्माण करू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी उफवांर विश्वास ठेवू नये असेही आवाह पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शिवसेनेचे पंजाबमधले कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली आज खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्यात आला होता. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. त्यावेळी शिवसेना आणि शीख संघटना आमनेसामने आल्यानंतर काहीकाळ येथील वातावरण तणावपूर्व बनले होते. या मोर्चाच्या विरोधात काही शीख युवकांनी शिवसैनिकांना माकड सेना म्हणत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Non Veg Milk: काय आहे 'नॉन-व्हेज दूध'? अमेरिका आणि भारताची चर्चा यावरच अडकली; शेतकरी मात्र चिंतेत

Latur News : निकटवर्तीयांकडून फसवणूक, आमदार देशमुखांच्या कंपनीत ९ कोटींचा गैरव्यवहार; सीईओंसह तिघांवर गुन्हा

Nashik News : ७२ नेते आणि अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात? गुप्त मिटवलेली प्रकरणे चर्चेत

Raj Thackeray : रामदास आठवले चिडले, राज ठाकरेंची दादागिरी; जसाश तसे उत्तर देणार, परप्रांतियांना मराठीवरून मारणे चुकीचं

Latest Maharashtra News Updates : कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT