Tiranga
Tiranga 
देश

तिरंग्याच्या प्रतिकृतेतील केक कापणे हा अवमान नाही : हायकोर्ट

सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई- भारताच्या नकाशाच्या आकारातील तिरंगा आणि मध्ये अशोक चक्राचे डिझाईन असलेला केक कापणे म्हणजे देशविरोधी कृत्य किंवा राष्ट्राच्या सन्मानाचा अपमान नाही, असा महत्त्वाचा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. the Prevention of Insults to National Honour Act, 1971 अंतर्गत हे देशाच्या सन्मानाचा अपमान ठरु शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती एन आनंद व्येंकटेश यांनी २०१३ मधील एका खटल्या प्रकरणी ही टिप्पणी केली असून देशभक्ती आणि देशाच्या सन्मानाविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यात काही शंका नाही भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे. पण, त्याबाबतचा अतिपणा देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या गौरवशाली भूतकाळाच्या दृष्टीने चांगले नाही, असं ते म्हणाले आहेत.

देशभक्ती म्हणजे केवळ झेंडे फडकावणे, घोषणा देणे नाही, तर जो चांगला प्रशासनासाठी लढतो किंवा प्रयत्न करतो. राष्ट्रीय सन्मानाचे प्रतिक देशभक्तीच्या समानार्थी असू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. तसेच न्यायमूर्तींनी रबिंद्रनाथ टॅगोर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला, 'देशभक्ती हे आमचे अंतिम आध्यात्मिक साध्य असू शकत नाही, मला मानवतेचा शोध घ्यायचा आहे. मी हिऱ्याच्या किंमतीमध्ये काचेचा ग्लास विकत घेणार नाही, तसेच मी देशभक्तीला मानवतेच्या वरचढ होऊ देणार नाही.'

2o13 ला ख्रिस्मस दिनादिवशी एका केकवर भारताच्या नकाशाच्या आकारातील तिरंगा आणि त्यामध्ये अशोक चक्र दाखवण्यात आले होते. हा के कापण्यात आला होता आणि जवळपास २५०० लोकांना वाटण्यात आला होता. या कार्यक्रमाला कोईंबतूर जिल्हाधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती. शिवायन अनेक धार्मिक नेते आणि एनजीओ सदस्य या कार्यक्रमासाठी आले होते. याविरोधात डी सेंथीकुमार यांनी तक्रार दाखल केली होती. केकवर भारतीय तिरंगा दाखवण्यात आला होता. त्यामुळे हे the Prevention of Insults to National Honour Act, 1971 नुसार देशाचा सन्मानाचा अपमान असल्याची तक्रार करण्यात आली होती. याअंतर्गत ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. 

भारतीय तिरंगा दाखवणारा केक कापल्याप्रकरणी कोर्टाने मागील काही संदर्भ तपासले. कोर्टाने यावेळी म्हटलं की, 'एका कृतीमागील एखाद्याचा हेतू लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. शिवाय त्यांचा देशाच्या सन्मानाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता.' एका कार्यक्रमामध्ये केक कापण्यात आल्याने देशाचा सन्मान कमी होतो का? स्वातंत्र्यादिवशी किंवा प्रजासत्ताक दिनादिवशी अनेक जण तिरंगा दर्शवणारे कपडे परिधान करतात.  त्यांच्या देशाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसतो. शिवाय कागदाचे झेंडे रस्त्यावर टाकून देण्यात येतात. त्यांच्याविरोधातही the Prevention of Insults to National Honour Act, 1971  अतर्गंत गुन्हा दाखल केला जावा का, याचं उत्तर नकारात्मकच येईल, असं कोर्टाने म्हटलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT