esakal | गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा का? ते शरद पवारांकडून  अनिल देशमुखांना अभय, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news home minister clarification dates about quarantine ncp leader sharad pawar deshmukh resignation

ज्या सरकारी-निमसरकारी किंवा खासगी कंपनी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या रेशनकार्ड अपात्र ठरविण्यात येणार आहे.

गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा का? ते शरद पवारांकडून  अनिल देशमुखांना अभय, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा का? यावर मात्र कोणताही निर्णय होऊ शकला नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपाचे शरद पवार यांनी खंडन केलं आहे. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब आणि विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले. महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याच्या आरोपामुळं गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागणार की, त्यांना क्लीन चीट मिळणार, याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. आज, संसदेतही हा मुद्दा चर्चेत आल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष याकडं लागलं आहे. महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप झाल्यानंतर, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. ज्या सरकारी-निमसरकारी किंवा खासगी कंपनी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या रेशनकार्ड अपात्र ठरविण्यात येणार आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांना इतर अनुज्ञेय रेशनकार्ड देण्यात येणार आहेत. 


महाराष्ट्र - परमवीरसिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांची तयारी सुरू - वाचा सविस्तर

देश - शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच देवेंद्र फडणवीसांचा टि्वट बॉम्ब - वाचा सविस्तर

देश - अनिल देशमुखांना अभय; शरद पवारांनी सगळे आरोप फेटाळले- वाचा सविस्तर

देश - Assembly Election: निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, NDA च्या तीन उमेदवारांचे नामांकन रद्द - वाचा सविस्तर

मुंबई -डिस्चार्ज, पत्रकार परिषद आणि क्वारंटाइन; अनिल देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण - वाचा सविस्तर

पुणे - संत्र्यानं खाल्ला भाव; तीन डझनाच्या पेटीला विक्रमी ६०० रुपयांची बोली - वाचा सविस्तर

पुणे - पुण्यात बोगस रेशनकार्डधारकाची शोधमोहीम - वाचा सविस्तर

मनोरंजन - शरद पोंक्षेंचं वेबविश्वात पदार्पण; पर्ण पेठेही साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका- वाचा सविस्तर

मनोरंजन - फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'फॅट टू फिट'च्या प्रवासात मुलांची मदत - वाचा सविस्तर

मनोरंजन - विरुष्का वामिकासोबत पुण्यात; एअरपोर्टवरील फोटो, व्हिडीओ व्हायरल- वाचा सविस्तर