cyber crime sakal media
देश

मेट्रो सिटींमध्ये सायबर क्राईम वाढला, २०२० ची आकडेवारी सर्वाधिक

भारतातील मेट्रो सिटींमध्ये सायबर क्राईम वाढल्याची घोषणा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने केली आहे.

ओमकार वाबळे

भारतात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या घटनेट वाढ झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये सर्वाधिक क्राईम रेट देशातील १९ मेट्रो सिटींमध्ये वाढल्याची घोषणा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने केली आहे. यासंबंधी एनसीआरबीने २०२० सालचे परिपत्रक जारी केले आहे. यातील आकडेवारीनुसार पुणे, मुंबई आणि नागपूर यांच्यासह देशातील अन्य मेट्रो सिटींमध्ये घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ २०१९ च्या तुलनेत 0.8% आहे.

देशभरातील सायबर गुन्हे विभागाअंतर्गत एकूण 18 हजार 657 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ज्यात 0.8% ची वाढ दिसून आली.

2019 पेक्षा जास्त (18,500 प्रकरणे) सायबर गुन्ह्यांचे प्रमाण 2019 मध्ये 16.2 वरून 2020 मध्ये 16.4 झाले. संगणक संबंधित गुन्हे (आयटी कायद्याचे कलम 66) नोंदवण्यात आले आहेत. 2020 मध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झालीय. याचे प्रमाण 60.9% आहे.

कोरोना काळात ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट सेवा, ऑनलाईन पेमेंट्स,यांच्याशी निगडीत सायबर गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे समोर आले होते. आता एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT