Cyclone Biparjoy Esakal
देश

Cyclone Biparjoy: एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळ तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के, गुजरातमध्ये IMDकडून ‘रेड अलर्ट’

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बुधवारी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

अंकिता खाणे (Ankita Khane)

अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून हे वादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने योग्य ती खबरदारी घेतली आहे. किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत 74000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून NDRFची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत.

तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बुधवारी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अरबी समुद्रात सध्या बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावत असताना हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अशी स्थिती असताना चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याआधी कच्छ जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

गांधीनगरमधील भूकंपशास्त्र संशोधन संस्थाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील बछाऊपासून पश्चिम-नैऋत्य दिशेला ५ किलोमीटर अंतरावर होता. काल संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

तीव्र झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छ किनारपट्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांतील समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.गुजरातमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची अठरा पथकं तैनात केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT