Cyclone Biporjoy esakal
देश

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला बसू शकतो तडाखा; IMD चा इशारा काय?

सकाळ डिजिटल टीम

Biporjoy Cyclone News : बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करण्याचा धोका संभवत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या आसपास हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसू शकतो.

IMDच्या ताज्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील 'बिपरजॉय' 15 जून रोजी दुपारच्या सुमारास गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानच्या किनार्‍या ओलांडून जाईल.

महाराष्ट्रालाही बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसत आहे. कोकण किनारपट्टीवर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे पडसाद दिसू लागले आहेत. सोसाट्याचा वारा, उधाणातून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीलगतच्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारपासूनच समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. समुद्रात उंच-उंच लाटा उसळू लागल्या आहेत. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ नावाच्या चक्रीवादळाचे संकेत असून ही चक्रीय स्थिती जूनपर्यंत राहणार असल्‍याने यादरम्‍यान समुद्र खवळलेला असेल.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळ काही तासांत तीव्र होण्याची शक्यता आहे, गुजरातचा धोका आता कमी झाल्याचं सांगण्यात येतंय. हे चक्रीवादळ पोरबंदर किनार्‍यापासून 200-300 किमी अंतरावर जाण्याची शक्यता आहे. परंतु येत्या पाच दिवसांत पश्चिमी भागात गडगडाट आणि जोरदार वारे वाहतील. त्यामुळे १५ तारखेपर्यंत बिपरजॉयच्या हालचालींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Audit For Shendapark Hospital : शेंडापार्कमधील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाचे होणार 'आयआयटी' ऑडिट! मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा निर्णय, बिले रोखली

आशिकीनंतर पुन्हा प्रेमकथेत आदित्य रॉय कपूर! आदित्य रॉय कपूरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; रोमान्स, अ‍ॅक्शन आणि संगीताचा तिहेरी धमाका

Latest Marathi News Update : पुण्यातील सदाशिव पेठेत मध्यरात्री दुकानाला आग

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Solapur: मंगळवेढा वगळून नदीकाठी पाच तासाचा वीज पुरवठा जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने शेतकऱ्यात संताप

SCROLL FOR NEXT