Cyclone Dithwa’s path toward India after crossing Sri Lanka
esakal
Cyclone Dithwa Overview : श्रीलंकेत सतत पाऊस, भूस्खलन आणि वाढत्या पुरासह 'दित्वा' चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. या वादळामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर पोहोचली आहे, तर २१ लोक अजूनही बेपत्ता आहेत. एवढंच नाहीतर या वादळामुळे श्रीलंकेतील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे ४४ हजार लोक प्रभावित झाले आहेत, तर अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.
या चक्रीवादळाचा परिणाम आता भारतातही जाणवणार आहे. 'दित्वा' चक्रीवादळ ३० नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकेल आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरातून जाईल असा अंदाज आहे.
तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे, काही ठिकाणी २० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर थोडा कमी होण्याची अपेक्षा आहे, परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने वृत्त दिले आहे की हे वादळ वेगाने पुढे जात आहे आणि ३० नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात पोहोचेल. आयएमडीने अनेक राज्यांसाठी पाऊस आणि वाऱ्याचा इशारा जारी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.