Hamoon Cyclone eSakal
देश

Hamoon Cyclone : हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली, सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

IMD Warning : या राज्यांमध्ये मणिपूर, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.

Sudesh

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. हे चक्रीवादळ आता वरच्या दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये मणिपूर, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. आसामचा दक्षिण भाग, मेघालयचा पूर्व भाग, तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागाला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं IMD ने स्पष्ट केलं आहे. आज (24 ऑक्टोबर) याठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

वादळी वाऱ्याचा इशारा

बंगालची खाडी आणि ईशान्य भारतात हामून चक्रीवादळामुळे वादळी वारे वाहतील. ओडिशाच्या किनारी भागामध्ये सुमारे 40 ते 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहतील. तर याचा वेग हळू-हळू वाढून 70 ते 75 किलोमीटर प्रतितास एवढा होण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या किनारी भागालाही याचा मोठा फटका बसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने आज आणि उद्या (25 ऑक्टोबर) मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील दिला आहे. हा इशारा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. 25 तारखेच्या संध्याकाळपर्यंत या चक्रीवादळाचा जोर कमी होईल, आणि ते संपून जाईल असा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT