Cyclone Remal Update esakal
देश

Cyclone Remal Update: बंगालच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर तीव्र चक्रीवादळ रेमल कमकुवत, अनेक ठिकाणी पाऊस; झाडेही उन्मळून पडली

Cyclone Remal: हवामान खात्याने सोमवारपर्यंत पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय आसाम आणि मेघालयमध्येही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Sandip Kapde

Cyclone Remal: तीव्र चक्री वादळात रूपांतरित झालेल्या 'रेमल'ने रविवारी रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडक दिली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान भारतीय हवामान विभागाचे (IMD) म्हणणे आहे की सोमवारी सकाळपर्यंत हे वादळ कमकुवत होऊन चक्री वादळात बदलू शकते. पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक राज्यांवर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयएमडीचे म्हणणे आहे की बंगालच्या उपसागरावरील रेमाल गेल्या 6 तासांत ताशी 13 किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. हवामान खात्याने माहिती दिली की, 'रेमल आणखी काही काळ उत्तरेकडे सरकत राहील आणि नंतर उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल आणि 27 मे 2024 च्या सकाळपर्यंत चक्रीवादळात कमकुवत होईल.'

हवामान खात्याने सोमवारपर्यंत पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय आसाम आणि मेघालयमध्येही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवारी मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रभाव 2 दिवस टिकू शकतो

हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशा वगळता ईशान्येकडील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये वादळाचा प्रभाव पुढील दोन दिवस टिकू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि रेमलशी सामना करण्यासाठी बैठक झाली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 

एका अहवालानुसार, रेमल जेव्हा किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर पोहोचल्यावर उंचावरील वादळाच्या लाटांमुळे सखल भागात पूर आला. वादळाची तीव्रता लक्षात घेता, बंगाल हवामानशास्त्र कार्यालयाने रविवारीच मच्छिमारांना सोमवार सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. 

बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारी जिल्ह्यांतील कमकुवत संरचना, वीज आणि दळणवळणाच्या लाईन, कच्चा रस्ते, पिके आणि बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा इशाराही देण्यात आला होता. बाधित भागातील लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नौदलासह आरोग्य कर्मचाऱ्यांना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे.

रेल्वे-हवाई सेवा ठप्प, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला

पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने पश्चिम बंगालच्या दक्षिण आणि उत्तर 24 परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात 12 गाड्या चालवण्यास बंदी घातली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत. कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने रविवारी दुपारपासून 21 तासांसाठी फ्लाइट ऑपरेशन स्थगित केले. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 394 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रभावित होणार आहेत. कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील माल आणि कंटेनर हाताळणी देखील रविवार संध्याकाळपासून 12 तासांसाठी बंद करण्यात आली होती. बंगालच्या अनेक भागात रविवारी सकाळपासून पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : विदर्भाचा अभिमान! नागपूरमध्ये मारबत उत्सवाला सुरुवात, काळ्या-पिवळ्या मारबतींच्या भेटीची उत्सुकता

SCROLL FOR NEXT