नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी 
देश

तौक्तेनंतर 'यास'चं संकट, मोदींनी बोलवली महत्वाची बैठक

नामदेव कुंभार

Cyclone Yaas : भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टीवर ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर आणखी एका चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. 'यास' चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. 'यास' चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे. ते बुधवारपर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये मंगळवारपासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. तौक्ते चक्रीवादळानं नुकतंच देशाच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं होतं. तौक्तेमुळं संपूर्ण जवजीवन विस्कळीत झालं होतं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये चक्रीवादळानं हाहा:कार माजवला होता. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. तौक्ते चक्रीवादळासारखं नुकसान पुन्हा होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरिय बैठक बोलवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळाच्या पुर्वतयारीसाठी रविवारी उच्चस्तरिय बैठक बोलवली आहे. यामध्ये वरीष्ठ सरकारी आधिकारी, एनडीए, दूरसंचार सचिव, ऊर्जा, नागरी उड्डाण मंत्रालयाचा समावेश असणार आहे. याशिवाय गृहमंत्री आणि इतर मंत्रायलायांना यामध्ये सहभाग नोंदवण्यास सांगितलं आहे. रविवारी ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये यास चक्रीवादळापासून बचाव करण्याची योजना आखली जाणार आहे.

अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने येत्या बुधवारी (ता. २६) आणि गुरुवारी (ता.२७) हे चक्रीवादळ पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. हे चक्रीवादळ तीन दिवस असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असताना बंगालच्या उपसागरात व अंदमान सागरात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहू शकतात. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत ताशी ७० किमीची वेग पकडू शकतात.या चक्रीवादळामुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.

नौदल, तटरक्षक दल सज्ज

ओडिशातील १४ ते ३० जिल्ह्यांवर या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून या जिल्ह्यांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीसाठी भारतीय नौदलाला आणि तटरक्षक दलाला सज्ज राहण्याची विनंती ओडिशा सरकारने केली आहे. तसेच रेल्वेने बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशला जाणाऱ्या २२ विशेष गाड्या रद्द केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT