Cyclone Nisarga, in Thane 
देश

राज्यावर तुफानी संकट ;‘निसर्ग’वादळ मुंबईसह कोकण किनाऱ्यास धडकणार 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ घोंघावणार असल्याने त्याला तोंड देण्यासाठी नौदलासह राज्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. या वादळाच्या प्रभावामुळे मंगळवार रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. 

येथे धडकणार 
अलिबाग (जि. रायगड) 
पश्‍चिम किनारपट्टी 

यांना धोका 
मुंबई, कोकण, दक्षिण गुजरात 

प्रभाव क्षेत्र 
हरिहरेश्वरगड (रायगड) ते दमण, गुजरात 

ऑरेंज अलर्ट (केरळ) 
तिरुअनंतपुरम, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड 

यलो अलर्ट 
कोल्लम, पथानामथिट्टा, कोट्टायम 

आपत्तीशी दोन हात 
पंतप्रधान मोदींकडून तयारीचा आढावा 
राज्यात एनडीआरएफची पथके तैनात 
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना 
मुंबईमध्ये नौदलाने कंबर कसली 
राजधानीत पालिकेने उभारले निवारे 

अतिदक्षतेचा इशारा 
पूर्वमध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका वाढला वाढल्यानंतर हवामान खात्याने मुंबई सह अन्य सहा जिल्ह्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याची सहा तासात तीव्रता वाढणार असून उद्या(ता.२) रोजी दुपारी अलिबाग परिसरात चक्रीवादळ किनाऱ्यास धडकेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हानीची शक्यता 
ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. हवामान खात्याचे उपमहासंचालक आनंद शर्मा यांनी दुजोरा देताना सांगितले, की महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा उपद्रव जाणवेल. या भागात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या राज्यांनाही धोका 
‘निसर्ग’ वादळामुळे उत्तर हिंदुस्थानात आग्नेय राजस्थान, हरियानाच्या आसपासचा भाग तसेच जम्मू काश्मीरच्या पूर्व भागातही वादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तर केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रासोबतच तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशाचा उत्तर भाग, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाना, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा काही भाग यात तुरळक पाऊस होऊ शकतो. 

पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि दीव-दमण, दादरा-नगर-हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल के. पटेल यांच्याशी निसर्ग वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'निवारा ट्रस्ट'च्या नावाखाली गोरगरिबांना 22 लाखांचा गंडा; पूजा भोसलेला 3 वर्षांनी अटक, कोल्हापुरात वेगवेगळ्या हॉलमध्ये लोकांना बोलवत होती!

अरशद वारसीला 'मुन्ना भाई'तील 'सर्किट' रोल करण्याची इच्छाच नव्हती, वाटलेलं करिअर बरबाद होईल

National Drink : भारताचे राष्ट्रीय पेय (ड्रिंक) काय आहे? चहा नाही बरं का...99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

SCROLL FOR NEXT