Congress Leader DK Shivkumar esakal
देश

DK ShivKumar: सत्तास्थापनेच्या घडामोडीत शिवकुमार संतापले! म्हणाले, 'त्या' मीडिया चॅनेल्सवर...

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत डी के शिवकुमार हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी सध्या खलबत सुरु असून काँग्रसचे संकटमोचक डीके शिवकुमार हे या शर्यतीत प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पण काही मीडिया चॅनेल्सनं त्यांच्याविरोधात बातम्या चालवल्यानं ते चांगलेच भडकले आहेत. 'त्या' चॅनेल्सविरोधात आपण अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (D K ShivKumar angry on some Media Channels in process forming govt in Karnataka)

शिवकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जर कुठल्याही चॅनेलनं मी राजीनामा दिल्याच्या बातम्या चालवल्या तर त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. काही माध्यमांनी अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या आहेत. माझा पक्ष म्हणजे माझी आई आहे. माझे हायकमांड, माझे आमदार, माझा पक्ष तिथं आहे, असं शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर काही दावा करणारे जी. परमेश्वर यांचे समर्थकही बनले आहेत. त्यांनीही आंदोलन सुरु केलं असून त्यांनी म्हटलंय की, जर पक्षाच्या हायकमांडंनं आम्हाला सरकार चालवायला सांगितलं तर आम्ही याची जबाबदारी घेतो असं त्यांनी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी नुकतंच म्हटलं होतं की, जर हायकमांडची इच्छा असेल तर मी सरकारची जबाबदारी घ्यायला तयार आहे. दरम्यान, दलित समाजातील मुख्यमंत्री व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, शिवकुमार यांनी मंगळवारी आपला भाऊ आणि काँग्रेस नेते डीके सुरेश यांच्यासह दिल्लीत आगमन झालं. यावेळी त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेटही घेतली. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील एक चर्चेतील नाव असून दुसरीकडं माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाचीही चर्चा आहे.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी १३५ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर ६६ जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं. जेडीएसला १९ अपक्षांना २ जागा तर इतर पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असल्यानं काँग्रेसला इथं स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT