देश

दलित तरुणाला मंदिरात फिरवलं नग्न

वृत्तसंस्था

चामराजनगर : कर्नाटकात आणखी एक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. एका दलित तरुणाला नग्न करून शनिश्वर मंदिरात फिरविण्यात आले. संबंधित तरुण देवाच्या मूर्तीला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला जात आहे. ही घटना कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथे घडली.

चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांकडून हा संतापजनक प्रकार करण्यात आला. याबाबत मंदिरातील पुजारी चंद्रप्पा यांनी सांगितले, की त्या तरुणाला मंदिरात यायचे होते. त्यानुसार तो प्रयत्नही करत होता. मात्र, त्यानंतर त्याला मी पाणी दिले. त्यादरम्यान त्या तरुणाने मला कॉलर पकडून शिवीगाळ केली. मंदिरात आला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्याला माझे कपडे दिले. त्याची मानसिक स्थिती ठिक नाही, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर त्याच्या भावानेच नग्नावस्थेत फिरवल्याचा आरोप केला. 

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर संबंधित तरुणाचा भावाने तक्रार दिली असून, या तक्रारीवर पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत.

मंदिरातील देवतांच्या मूर्तींना नुकसान करण्याचा होता प्रयत्न

या तरुणाकडून मंदिरातील देवतांच्या मूर्तींना नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार या संशयातून हे कृत्य झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT