Churu, Rajasthan Team eSakal
देश

दलित व्यक्तीचं अपहरण करुन मारहाण; मूत्र पिण्यासंही भाग पाडलं

देशाच्या प्रजासत्ताकदिनी ही लाजीरवाणी घटना घडली आहे.

सुधीर काकडे

नुकतीच देशाची प्रजासत्ताकाची ७३ वर्ष पुर्ण (Republic Day of India) झाली, मात्र अजूनही दलित अत्याचारांच्या (Dalit Atrocities) घटनांना चाप बसलेली नाही. अशीच एक देशासाठी लाजीरवाणी घटना राजस्थानच्या चुरू (Churu, Rajasthan) जिल्ह्यात घडली आहे. चुरु जिल्ह्यात एका दलित व्यक्तीचं अपहरण करून, अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताकदिनी ही घटना घडली.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत काही लोकांनी एका दलित व्यक्तीचं अपहरण करून, त्याला बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्याला लघवी पिण्यास भाग पाडलं. एकूणच या घटनेतील पीडित व्यक्तीवर गंभीर अत्याचार करण्यात आल्याचं या घटनेतून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती चुरू जिल्ह्याचे अतिरिक्त जगदीश प्रसाद बोहरा यांनी दिली आहे.

घटनेतील पीडित व्यक्तीने आरोपींनी आपल्याला जातीयवादी शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. तसंच पिडित व्यक्तिच्या पाठीवरील जखमा पाहता, त्याला मारहाण झाल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

Latest Marathi News Live Update : बिडकीनमध्ये गॅस तुटवड्याने नागरिकांची धावपळ वाढली

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT